श्री. प. पू. रामानंद महाराज जन्मोत्सव

अत्यानंदे कळविण्यात येते की, दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा माघ वद्य नवमी ते माघ वद्य अमावस्या म्हणजेच शुक्रवार दि. १३/२/२०१५ ते बुधवार दि.१८/२/२०१५ या कालावधीमध्ये श्री दासनवमी प.पू. श्री. रामानंद महाराज जन्मोत्सव व प.पू. प्रल्हाद महाराज जन्मोत्सव, विविध कीर्तन, प्रवचन, भजन, नामस्मरण इत्यादी कार्यक्रमांनी मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. या सर्व कार्यक्रमात सहकुटुंब व उपासना मंडळातील सद्गुरु भक्तांसहित उपस्थित राहून गुरुसेवेचा व दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती.