मुख्य पृष्ठ

श्री गोविंद रामानंद समर्थ सदगुरू प्रल्हाद महाराज (रामदासी) संस्थान, श्रीक्षेत्र साखरखेर्डा, येथे पुरातन श्री बालनाथ मंदिर असून प. पू. श्रीरामानंद महाराज साखरखेर्डा येथे आल्यानंतर साखरखेर्डेकर देशपांडे यांनी श्रीरामानंद महाराजांना सदर बालनाथ संस्थानमध्ये राहण्याची विनंती केली व त्या अनुशंघानेच पुढे श्रीरामानंद महाराजांनी देह ठेवल्यावर हे पुरातन बालनाथ मंदिर प. पू. श्रीरामानंद महाराजांचे चरणी अर्पण करण्यात आले. प. पू. श्रीप्रल्हाद महाराजांनी सदगुरू रामानंद महाराजांच्या आज्ञेने सांप्रदायिक उपासना प्रचाराचे कार्य याच ठिकाणवरून वृद्धिंगत करण्यासाठी १९६२ साली श्रीगोविंद रामानंद संस्थान या नावाने ट्रस्ट स्थापन करून दैनदिन उपासना व नामप्रचाराचे कार्य अविरत केले.

प. पू. श्रीप्रल्हाद महाराजांचे प्रकृती अस्वास्थ तसेच वृद्धापकाळ , यामुळे श्रीमहाराजांनी आपल्या जागेवर इतर विश्वस्तांची नियुक्ती केली. प. पू. श्रीप्रल्हाद महाराजांनी देह ठेवल्यावर या संस्थान चे नाव श्री गोविंद रामानंद समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज (रामदासी) संस्थान, श्रीक्षेत्र साखरखेर्डा, असे करण्यात आले. श्रीमहारांजाच्या संमतीने न्यासनोंदणी करून निर्धारित सांप्रदायिक कार्य करण्याची प्रेरणा विश्वस्त मंडळीना करवून पुढील कार्य आजतागायत सुरु आहे. यात प्रामुख्याने दैनंदिन उपासना, काकड आरती ते शेजारती , नित्य अन्नदान सेवा,सांप्रदायिक भिक्षा, श्रीरामनामप्रचार कार्य आणि प्रतीवार्षिक उत्सव-महोत्सव साजरे करणे यांचा समावेश आहे.

Leave a Reply